घु़ंगर्डे हादगाव ( प्रतिनिधी ) : अंबड तालुक्यातील गोंदी येथे गुरुवारी दि. २१ ऑगस्ट २०२५ रोजी गोंदी येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. राजेंद्र महाराज वाघमारे यांच्या मातोश्री वै. गं. भा. सागरबाई मोहनराव वाघमारे यांच्या पुण्यस्मरण निमित्त महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, विनोदाचार्य ह. भ. प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे हरी किर्तन सायंकाळी ७ ते ९ यावेळेत होणार आहे. तरी गोंदी आणि परिसरातील भाविक भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घ्यावा असे ह. भ. प. राजेंद्र महाराज वाघमारे गोंदीकर यांनी सांगितले आहे.

Post a Comment
0 Comments