Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

"विकासाचा विजयमार्ग – अंबड तहसीलची प्रशंसनीय झेप!"

 



– तहसीलदार विजय चव्हाण यांच्या नेतृत्वात प्रशासनाची उल्लेखनीय कामगिरी


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

अंबड तहसील कार्यालय हे प्रशासनाच्या गतवर्षातील कार्याच्या बाबतीत संपूर्ण जिल्ह्यात एक उदाहरण ठरले आहे. तहसीलदार विजय चव्हाण यांच्या गतिशील नेतृत्वात महसूल प्रशासनाने केवळ शासकीय यंत्रणेचा चेहरा उजळवला नाही, तर सर्वसामान्य जनतेला न्याय, सेवा आणि योजनांचा प्रत्यक्ष लाभ पोहोचवण्याची कामगिरी यशस्वीरित्या बजावली आहे.

 अर्धन्यायिक प्रकरणांमध्ये ऐतिहासिक निकाल

गेल्या वर्षभरात प्रलंबित शेत रस्ते व फेरफारसह ९० हून अधिक प्रकरणे निकाली काढण्यात आली. ६४ शेत रस्त्यांची तडजोड न करता प्रत्यक्ष भूमीवर उघडण्यात आली, ही एक प्रशासनिक क्रांतीच म्हणावी लागेल. यामुळे हजारो शेतकऱ्यांना आपले हक्काचे रस्ते मिळाले.

वाळू माफियांवर कठोर कारवाई – कायद्याचा बडगा

तालुक्यात १००% अवैध वाळू उपसा थांबवण्याचा पराक्रम केवळ तहसीलदारांच्या धाडसी निर्णयक्षमतेमुळे शक्य झाला. २६ गुन्हे, ८४५ आरोपी, ७.५२ कोटींचा बोजा आणि ६३ वाहनांवर कारवाई – ही केवळ आकडेवारी नाही, तर प्रशासनाचा बंदोबस्त व लोकहितासाठीचा निर्धार दर्शवणारे पुरावे आहेत.

शेतकरी आणि गरीब कुटुंबांना दिलासा

२३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत पोहोचवणे, ३० अपघातग्रस्त कुटुंबांना विमा लाभ देणे आणि नैसर्गिक आपत्तीतील नुकसान भरपाईचे वितरण हे प्रशासनाच्या संवेदनशीलतेचे निदर्शक आहे.

लोकसेवा आणि प्रमाणपत्र वितरणात नवा विक्रम

वर्षभरात हजारो नागरिकांना उत्पन्न, जात, अधिवास, नॉन-क्रिमिलेअर यासह महत्त्वाची प्रमाणपत्रे मिळाली. हे काम वेळेवर, अचूक आणि तांत्रिक माध्यमांतून पार पडल्यामुळे नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास अधिक घट्ट झाला आहे.


 रेशन कार्ड आणि अन्नसुरक्षा – घराघरात पोहोचले प्रशासन


ई-रेशन कार्डचे वितरण आणि तलाठ्यांमार्फत घरोघरी जाऊन लाभ मिळतो की नाही याची खातरजमा करणे – ही कार्यपद्धती शासन आणि जनतेतील दरी मिटवणारी ठरली आहे.

 विजय चव्हाण यांचे वर्णन

 "धाडस ज्यांचे शस्त्र, नियोजन ज्यांचे अस्त्र,

प्रशासनात जिथे ‘विजय’, तिथे विकासही नक्कीच जिंकतो!"

> "शब्द नव्हे, काम बोलते – तहसीलदार विजय चव्हाण यांचे नेतृत्व अंबडसाठी वरदान!"

 अशा नेतृत्वामुळे अंबड तालुका महसूल कारभाराच्या बाबतीत आदर्श ठरत आहे. या यशस्वी कामगिरीची दखल घेणे ही केवळ पत्रकारितेची जबाबदारी नव्हे, तर समाजाप्रती असलेली एक सकारात्मक भूमिका आहे.

Post a Comment

0 Comments