Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महसूल मंत्री बावनकुळे यांची प्रथमच अंबडला उपस्थिती; मान्यवरांचा जमणार मेळावा

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

अंबड – जिल्हास्तरीय महसूल सप्ताहाचा समारोप सोहळा अंबड शहरातील श्री मत्स्योदरी देवी प्रांगणात असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात ८ ऑगस्ट रोजी दुपारी ११.३० वाजता होणार आहे. या सोहळ्यास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रथमच अंबडमध्ये आगमन करणार असून त्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ही माहिती भाजपाचे ग्रामीण जालना जिल्हाध्यक्ष आमदार नारायण कुचे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेत देविदास कुचे, तालुकाध्यक्ष प्रदीप पवार, माजी नगराध्यक्ष सुरेश गुढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवधूत नाना खडके, भाजपाचे संजय जाधव, बाळू तायडे, दीपक ठाकूर, नगरसेवक फेरोज शेख व रमेश बुंदेलखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार कुचे म्हणाले की, “महसूल मंत्री प्रथमच अंबडमध्ये येत असल्याने त्यांच्या स्वागतासाठी शहर सज्ज आहे. सोहळा संपताच ते जालना येथे पुढील कार्यक्रमासाठी रवाना होतील.”

या प्रसंगी पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री व जालनाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार डॉ. कल्याण काळे, खासदार संजय जाधव, तसेच आमदार सतीश चव्हाण, बबनराव लोणीकर, राजेश राठोड, संतोष दानवे, विक्रम काळे, अर्जुनराव खोतकर, हिकमत उढाण यांच्यासह छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नु पी. एम., पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, अंबडचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार विजय चव्हाण आदी मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे.

Post a Comment

0 Comments