Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी मोहीम : रामनगरातून गांजा विक्रेत्याला अटक

 


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

जालना (दि. 19 ऑगस्ट) – अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामनगर येथे छापा टाकून 23,000 रुपये किंमतीचा 928 ग्रॅम गांजा जप्त केला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांना गुप्त बातमीदारामार्फत आरोपी राजेश शांतीलाल जैस्वाल (वय 38, रा. रामनगर, जालना) याच्याकडे अवैध गांज्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार 18 ऑगस्ट 2025 रोजी संध्याकाळी सात वाजता शासकीय पंचासमक्ष छापा टाकण्यात आला. तपासणीदरम्यान आरोपीकडून एकूण 23 हजार रुपये किंमतीचा 928 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.

या कारवाईबाबत संभाजी तनपुरे यांच्या फिर्यादीवरून मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सपोनि. योगेश उबाळे, सपोनि. सचिन खामगळ, पोलीस अंमलदार जगदीश बावणे, कैलास खार्डे, रुस्तुम जैवाळ, रमेश राठोड, प्रशांत लोखंडे, किशोर पुंगळे व वाहन चालक पोकॉ कडुळे यांनी सहभाग घेतला.


Post a Comment

0 Comments