Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कै.दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हापातळीवर निवड

 


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

(अंबड)- दिनांक 21/8/25 रोजी झालेल्या शालेय तालुकास्तरीय बुद्धिबळ व योगासन या क्रीडा स्पर्धेमध्ये कै.दत्ताजी भाले प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यश संपादन केले.

 योगासन या खेळामध्ये 1.कु.अर्पिता जराड 2.ओजस्वी साळवे 3.शिवानी दायमा 4.तन्वी जाधव तसेच बुद्धिबळ या स्पर्धेमध्ये ज्ञानेश्वरी पोळ या विद्यार्थिनीने यश संपादन केले. व त्यांची जिल्हास्तरीय साठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्रजी आलूरकर तसेच संस्थेच्या उपाध्यक्ष ज्योती भाभी ठाकूर कार्यवाह डॉ. हेमंतजी वैद्य तसेच प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत मुळे सर तसेच स्थानिक चे अध्यक्ष व्यंकटेश गोसावी,कार्यवाह केदार मंत्री तसेच प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप जोशी सर यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. व विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना नितेश चव्हाण क्रीडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले आहे. 

या यशा बद्दल सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments