अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
अंबड शहरातील बैलपोळ्याचा थाटमाट आणि शेतकऱ्यांचा आत्मीय सण येतो तेव्हा नगरपरिषदेची जाग येते! दरवर्षीप्रमाणे यंदाही दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी, शुक्रवार, शहागड वेस येथे मोठा पोळा भरतो. पण या सणाची चाहूल लागताच नगर परिषदेला अचानक आठवण झाली – “अरे! ही जागा तर साफ करायची आहे!”
मग धावपळ सुरू झाली. स्वच्छतेच्या नावाखाली कर्मचारी, गाड्या, झाडू, गंजलेली बादली आणि फोटो काढायला नेहमी तयार असणारे काही मान्यवर एकत्र आले. रमेश बुंदेलखंडे व नगरपरिषद कर्मचारी या सगळ्या घाईगडबडीत मग्न होते.
शेतकरी बैलाला देव मानतो, बैलासाठी पोळा साजरा करतो. पण नगरपरिषदेच्या दृष्टीने “बैलपोळा म्हणजे सफाईचा आठवण करून देणारा दिवस” इतकंच उरलंय! कारण इतर दिवशी स्वच्छता कुठं हरवते, हा प्रश्न अजूनही नागरिकांना सतावतो.
“सण आलाच की शहर झळाळतं,
बाकी दिवशी मात्र कचऱ्यात लोटांगण घालतं.
ही आहे आपल्या नगरपरिषदेची कार्यपद्धती,
जनतेच्या संयमावर चाललेली ही दुर्दैवी कहाणी!”
तथापि, या पार्श्वभूमीवर रमेश बुंदेलखंडे यांचं कौतुक करायलाच हवं. स्वच्छतेच्या प्रश्नावर नेहमी आवाज उठवणारे, वेळोवेळी प्रशासनाच्या डोळ्यात झोप उडवणारे हे नाव आजही चर्चेत आहे.
“जो सत्य बोलतो, तो नेहमी एकटा दिसतो,
पण त्याच्या शब्दांमुळे व्यवस्था जागी होते.
रमेश बुंदेलखंडे असाच एक योद्धा आहे,
ज्याच्या आक्रोशानं शहराला नवा श्वास मिळतो.”
आज पुन्हा एकदा बैलपोळा आला आणि नगरपरिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. स्वच्छता केवळ सणापुरती की कायमस्वरूपी? हा प्रश्न अजूनही हवाेत तरंगतोय…

Post a Comment
0 Comments