दि. २२ (प्रतिनिधी):प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) अंतर्गत दिवंगत संतोष कंटुले (खातेदार, बँक ऑफ महाराष्ट्र, कुंभार पिंपळगाव शाखा, ता. घनसावंगी) यांच्या पत्नी सौ. रत्नमाला संतोष कंटुले यांना रु. २ लाखांचा विमा दावा वितरित करण्यात आला.
हा धनादेश मा. जिल्हाधिकारी सौ. असीमा मित्तल (IAS) व बँक ऑफ महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर झोनचे उप अंचल प्रबंधक श्री. मुकुंद कांबळे यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.
जिल्ह्यातील स्थिती :
PMJJBY अंतर्गत पात्र बचत खातेधारक: १३.६७ लाख
प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) खातेधारक पात्र: ४.७० लाख
एकूण PMJJBY कव्हरेज: २.४४ लाख
PMJJBY अंतर्गत दावे वितरित: २२४ लाभार्थी (प्रत्येकी रु.२ लाख)
PMSBY अंतर्गत दावे वितरित: ६४ लाभार्थी
यावेळी नागरिकांना आवाहन करण्यात आले की, १८ ते ५० वयोगटातील सर्वांनी PMJJBY योजनेत नोंदणी करावी. या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही. शेतकरी, कामगार, व्यावसायिक, नोकरदार सर्वजण या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच वार्षिक फक्त रु. २०/- प्रीमियम भरून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) अंतर्गत अपघाती मृत्यू अथवा अपंगत्वाच्या प्रकरणात रु.१ ते २ लाखांचे विमा संरक्षण मिळू शकते.
या कार्यक्रमाला श्री. मंगेश केदार (लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर, जालना), श्री. हितेश दामोर (शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, कुंभार पिंपळगाव), श्री. आकाश पाटील (बी.डी.ओ., बँक ऑफ महाराष्ट्र) व श्री. कैलास तावडे (वित्तीय साक्षरता सल्लागार, जालना जिल्हा) आदीमान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments