Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

लंपी व लाळ्या-खुरकुत नियंत्रणासाठी अंबड तालुक्यात जनावरांचे लसीकरण मोहिमेला सुरूवात

 


प्रतिनिधी / पारनेर – गणेश पाटील शेरे

अंबड तालुक्यातील हरतखेडा येथे आज शुक्रवार, दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी जनावरांना लंपी व लाळ्या-खुरकुत प्रतिबंधक लस देण्यात आली. या मोहिमेत तब्बल 200 जनावरांचे लसीकरण करण्यात आले.


मागील 2022-23 या काळात लंपी आजाराने मोठ्या प्रमाणावर जनावरे दगावली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. याची दखल घेत शासनाने वेळीच लसीकरणासाठी डोस उपलब्ध करून दिले असून, तालुक्यातील विविध गावांमध्ये पशुवैद्यकीय कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.


गेल्या दोन दिवसांत हरतखेडा, पारनेर, लालवाडी, बोरी, मसई, धनगरपिंप्री, शेवगा, मठपिंपळगाव, सारंगपूर, बठान, आलमगाव, नागरी, पानेगाव, धुदपुरी, दहिपुरी आदी गावांमध्ये जनावरांना लसीकरण करण्यात आले.काल धनगरपिंप्री येथे पशु अधिकारी डॉ. के.सी. पिसाळ, डॉ. आर.ए. शिंदे व डॉ. देवकर यांच्या उपस्थितीत हरतखेडा, धनगरपिंप्री आदी गावातील जनावरांना लसीकरणाचे डोस देण्यात आले.सध्या उर्वरित गावांमध्येही ही लसीकरण मोहीम सुरू असून, तालुक्यातील सर्व जनावरांना लसीकरण करून सुरक्षित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे पशुवैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आले.


Post a Comment

0 Comments