घुंगर्डे हादगाव ( प्रतिनिधी)
यशवंतराव चव्हाण सेंटरचा खास उपक्रम
जालना , दि.21 - येथील यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र जालनातर्फे शनिवार दि.23 आॅगस्ट रोजी ' छोटे सायंटिस्ट उपक्रमा ' अंतर्गत नोंदणीकृत विज्ञान शिक्षकांसाठी एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे .
मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालय , नागेवाडीजवळ छ.संभाजीनगर रोड , जालना च्या सभागृहात सकाळी 9 ते 5 वेळेत आयोजित या कार्यशाळेचे उद् घाटन माजी मंत्री तथा सेंटरचे जिल्हाध्यक्ष राजेशभैय्या टोपे यांच्याहस्ते सकाळी 10 वा.होणार आहे. याप्रसंगी सीएस आर प्रकल्प समन्वयक रविराज दामले , ज्ञान प्रबोधनीचे विनायक माळी , प्रकल्प समन्वयक अनिकेत कुंभार , सहाय्यक प्रकल्प समन्वयक पांडुरंग मांटे , यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईचे शिक्षण विभाग प्रमुख योगेश कुदळे आणि पत्रकार प्रा.सुरेश केसापूरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .
कार्यशाळेत पहिल्या सत्रात पुणे येथील ज्ञान प्रबोधिनीचे विनायक माळी आणि दुपारनंतर दुस-या सत्रात सीएसआर समन्वयक रविराज दामले अनुक्रमे ' निरीक्षण कौशल्य ' व ' परिसर अभ्यास कौशल्य ' या विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत. समारोप सत्रासाठी प्रसिद्ध उद्योजक तथा सेंटरचे ज्येष्ठ सदस्य सुनीलभाई रायठठ्ठा यांना आमंत्रित करण्यात आले असून डाॅ.आदिनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यशाळेत सहभागी विज्ञान शिक्षकांना प्रमाणपत्र व स्मृती पुस्तिका वाटप करण्यात येणार असून योगेश कुदळे यावेळी सेंटर अंतर्गत शिक्षण विकास मंचबद्दल माहिती देणार आहेत . जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत विज्ञान शिक्षकांनी कार्यशाळेसाठी वेळेवर उपस्थित रहावे , असे आवाहन सेंटरचे सचिव प्रा.डाॅ.रावसाहेब ढवळे , जिल्हा समन्वयक प्रा.रंजीत बायस तसेच शिक्षण विकास मंच चे जिल्हा समन्वयक कल्याण सोळुंके , प्रा.डाॅ.रविकिरण भुतेकर , भास्कर शिंदे , निलेश जोशी आणि वैशाली फोके यांनी केले आहे.
.

Post a Comment
0 Comments