अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविण्यासाठी सरकारने अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे.
यापूर्वी ही मुदत १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत होती; मात्र अनेक वाहनधारकांना अपॉइंटमेंट उशिरा मिळणे, ग्रामीण भागातील फिटमेंट केंद्रांची उशिरा उभारणी, काही केंद्रे बंद पडणे, तसेच लोकप्रतिनिधी व जनतेच्या मागणीमुळे ही मुदत वाढवण्यात आली आहे.
३० नोव्हेंबरनंतर कडक कारवाई निर्धारित मुदतीनंतर HSRP न लावलेल्या वाहनांवर वायुवेग पथकमार्फत कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र ज्यांना ३० नोव्हेंबरपूर्वी अपॉइंटमेंट मिळालेली असेल, त्यांच्यावर कारवाई होणार नाही.
याशिवाय HSRP नसलेल्या वाहनांचे हस्तांतरण, कर्जबोजा चढविणे/उत्तरविणे, पुनर्नोंदणी, परवाना नूतनीकरण आदी कामांवरही बंदी असेल. तपासणीदरम्यान जप्त झालेल्या वाहनांना HSRP बसविल्याशिवाय सोडण्यात येणार नाही.
वाहनमालकांना आवाहन
सर्व प्रादेशिक व उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना या निर्णयाबाबत व्यापक जनजागृती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहनमालकांनी वेळेत HSRP बसवून दंडात्मक कारवाई टाळावी, असे परिवहन विभागाच आवाहन आहे.


Post a Comment
0 Comments