Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

“शेतकरीच खरा मानकरी” — अवधूत नाना खडके यांचा ऐतिहासिक निर्णय; वडीगोद्रीत फळ मार्केटचे बळीराजाच्या हस्ते लोकार्पण!





 अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

वडीगोद्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजारपेठेत आज (१४ ऑगस्ट) एक ऐतिहासिक क्षण घडला. पारंपरिक पद्धतीनुसार एखाद्या राजकीय नेत्याच्या हस्ते उद्घाटन न करता, सभापती अवधूत नाना खडके यांनी थेट बळीराजाच्या हस्ते फळ मार्केटचे भव्य उद्घाटन करून नव्या आदर्शाची नोंद वडीगोद्रीच्या इतिहासात कोरली. शेतकऱ्याला मान देणारा हा निर्णय पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अभिमानाचे आणि कृतज्ञतेचे अश्रू चमकले.

गेल्या अनेक दशकांपासून विकासाच्या प्रतीक्षेत असलेली आणि ओसाड पडलेली वडीगोद्री बाजारपेठ आज नव्या रूपात उभी राहत आहे. सोलापूर–धुळे व जालना–वडीगोद्री या दोन महत्त्वाच्या महामार्गांच्या संगमाजवळ पसरलेल्या तब्बल ६१ एकर जागेच्या या बाजार समितीवर पूर्वी दुर्लक्ष झाले होते. मात्र सत्ता परिवर्तनानंतर अवधूत नाना खडके यांच्या नेतृत्वाखाली विकासाला नवा वेग मिळाला.



सभापती झाल्यानंतर खडके यांनी १०० टन क्षमतेचा वजन काटा बसवून ऊस, मोसंबी, डाळिंब, टरबूज यासह विविध शेतमालाच्या व्यापाराला गती दिली. मोसंबी मार्केटसाठी २७ सुसज्ज गाळ्यांची उभारणी पूर्ण झाली असून आगामी काळात भुसार मार्केट, कोल्ड स्टोरेज आणि शेतकरी हिताचे इतर उपक्रम सुरू करण्याची योजना आहे. नुकतेच १ कोटी ५२ लाख ७१ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकासह ‘शेतकरी भवन’ प्रकल्पालाही हिरवा कंदील मिळाला आहे.

आजच्या उद्घाटन सोहळ्यास माजी रेल्वेमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार नारायणभाऊ कुचे, आमदार अर्जुनभाऊ खोतकर, आमदार हिकमतदादा उढाण, सतीश रावजी घाडगे पाटील, उपसभापती अरुणराव घुगे, संचालक मंडळ, पंचक्रोशीतील मान्यवर, शेकडो शेतकरी, गावकरी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय विविध गावांतील सरपंच, माजी संचालक, ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवक आणि स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

उपस्थित मान्यवरांमध्ये शिवाजीराव कटारे, केदारदादा कुलकर्णी, पंजाबराव सोळुंके, भैय्यासाहेब हातोटे, शेखर बापू सोळुंके, श्रीराम नागरे, रामकिसन जाधव, धनंजय चावरे, शिवाजीराव जराड, केदार राठी, श्रीमंत खरात, संगीता ताई जराड, हौसाबाई डोईफोडे, बालाजी खोजे, जगन दुर्गे, विलास शिंदे, बंडू मुंडे, श्रीकांत बांगर, रवी चपटे, दीपक राव पवार, अ‍ॅड. विजुभाऊ खटके, तुकाराम वायाळ, पंडितराव गावडे, नारायणराव वायाळ, अण्णासाहेब पवार, बाबासाहेब गावडे, बप्पासाहेब काळे, रामदास काळे, राजेंद्र खटके, विष्णुदास खटके, रामचंद्र गावडे, रोहिदास पवार, अशोकराव तारक, बाळासाहेब नाझरकर, रामेश्वर माने, ज्ञानेश्वर गावडे, राजेंद्र छल्लारे, आबासाहेब वाघमारे, संजय पाटील कवळे, उमेश राव कवळे, महाकाळ संजय खैरे, संतोष आटोळे, सुधीर बोंबले, दत्ता गावडे, राहुल खटके, दिनेश काळे, अ‍ॅड. वैभव खटके, बाबा दखणे, जयराम माने, दत्ता दिघे, शांतीलाल खारतोडे, विठ्ठल सुडके, प्रवीण हर्षे, तुकाराम भरणे, जावेद शेख, नितीन काळे, संभाजी काळे, बापूराव काळे, नवनाथ तारक, सचिन गावडे, अनंत सुगंध सेट संचेती, काशिनाथ खांडेभराड, रामप्रसाद दसपुते, साहेबराव लबडे, शंकरराव गोडसे, कचरू सिंग बहुरे, भिकन चंद घुशिंगे, बळीराम वैद्य, श्रीराम मेहेर, चत्रभुज एखंडे, भीमसिंह बामनावत, रामेश्वर टकले, पांडुरंग टकले, नाथाजी पुंडकर, रंगनाथ वैद्य, केशव नाना पाटील, किशोर टकले, बद्री दसपुते, शिवाजी दसपुते, बाबासाहेब खरात, विठ्ठल भिसे, पुंडलिक घुगे, खाजा पटेल, दारासिंग मुराडे, विजू शेठ बारवाल, नंदू पाटील, हनुमान तायडे, विजू काका डोंगरे, एकनाथ डोंगरे, संपत जमदाडे, ऋषिंधर वाबळे, बळीराम सपकाळ, भगीरथ कचरे, श्रीनाथ डोंगरे, उद्धव डोंगरे, सतीश एखंडे, बाबासाहेब खडके, राजेंद्र सोळुंके तसेच बाजार समितीचे प्रभारी सचिव कल्याणराव चोथे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या शेवटी अवधूत नाना खडके म्हणाले, “शेतकरी हा देव आहे. त्याच्या घामामुळे आपल्या पोटात घास जातो. म्हणूनच त्यालाच सर्वात मोठा मान द्यायला हवा.” त्यांच्या या विचारांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला आणि उपस्थित शेतकऱ्यांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्यांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments