Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

घुंगर्डे हादगाव येथील दुर्गा देवीच्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

 



बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव प्रतिनिधी 


अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील नवसाला पावणारी दुर्गा देवीच्या नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भक्तांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून दुर्गा माता आहे. अशी भक्तांमध्ये श्रद्धा आहे. भक्त देवीची परडी घेऊन सलग नऊ दिवस उपवास करतात. सलग नऊ दिवस मंदीरात भजन, कीर्तन, जागरण गोंधळ घातला जातो. आरतीसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात. भक्तासाठी दररोज फराळ , महाप्रसाद, फळांचे वाटप करण्यात येते. नऊ दिवस मंदीरात महीला व पुरुषांची मोठी गर्दी असते. भक्तांच्या नवसाला पावणारी देवी म्हणून दुर्गा देविची ओळख आहे. परडी घेऊन महिला नऊ दिवस येथे उपवास करतात. मंदीर परीसरात साफसफाई व रंगरंगोटी करण्यात आली आहे. 

घुंगर्डे हादगाव येथे दुर्गा देवी मंदिर आहे. नवरात्र काळात मंदीरात मोठा उत्सव असतो. नवसाला पावणारी देवी म्हणून दुर्गा माता ची ओळख आहे. देवीवर भक्तांची श्रद्धा आहे. 

वंदना काळे सरपंच घुंगर्डे हादगाव

Post a Comment

0 Comments