अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
अंबड शहरातील बीड-अंबड रोडवर दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी, रविवारी संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप (MH 28 AB 2195) हे वाहन अंबडकडून जात असताना अचानक बीडकडे वळण घेतले. त्याच वेळी जालना वरून बीडकडे जाणाऱ्या मोटारसायकल (MH 21 AC 6667) ला पिकअपची जोरदार धडक बसली.
या अपघातात मोटारसायकलस्वाराच्या डोक्याला मार लागून तो जखमी झाला आहे. तसेच मोटारसायकल आणि मोबाईल फोनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जखमीला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर काही वेळ बीड-अंबड रोडवर वाहतूक कोंडी झाली होती.

Post a Comment
0 Comments