अंबड वार्ता (प्रतिनिधी): आकाश जळके
महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगार हमी योजनेअंतर्गत शेवगा लागवडीसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार पंचायत समिती अंबड येथे शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव सादर केले. मात्र, या प्रस्तावांच्या मंजुरीत गंभीर अनियमितता होत असल्याचे समोर आले आहे.
शेतकऱ्यांकडून आर्थिक देवाणघेवाण केल्याशिवाय प्रस्तावांना मंजुरी दिली जात नसल्याचा आरोप होत असून त्यामुळे प्रामाणिक शेतकरी योजनेंतर्गत लाभापासून वंचित राहत आहेत.
या संदर्भात शिवसेना (शिंदे गट)चे तालुकाप्रमुख शिवाजी जऱ्हाड यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर करून तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. “सर्व पात्र शेतकऱ्यांचे शेवगा लागवडीचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यात यावेत. अन्यथा शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा जऱ्हाड यांनी दिला आहे.
👉 या निवेदनामुळे पंचायत समिती प्रशासनावर दबाव वाढला असून शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंगाविरुद्ध लवकरच संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

Post a Comment
0 Comments