बंडु शिंगटे / घुंगर्डे हादगाव
अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील सात शिक्षकांच्या बदल्या झाल्या मुळे घुंगर्डे हादगाव ग्रामपंचायत कार्यालय कडुन बदली झालेल्या शिक्षकांना निरोप देण्यात आला व नविन आलेल्या शिक्षकांचा ग्रामपंचायत कार्यालय व ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. घुंगर्डे हादगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील सहा शिक्षक व एक शिक्षीकेची बदली झाली आहे. सहशिक्षिका गावडे मॅडम, नागरगोजे, पवार , हेलवडे, उगले, धोंडगे , वायाळ यांच्या बदलीमुळे संपुर्ण शाळा भावुक झाली होती. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील घट्ट नात्याचे हे प्रेम पाहून पालकही गहिवरून गेले. निरोप समारंभात सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. हे शिक्षक म्हणजे विद्यार्थी आणि गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी होते. त्यांच्या कार्यामुळे गावात शैक्षणिक व सामाजिक जाणीव जागृत झाली. अशा शब्दात गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी सरपंच भरत काळे, उपसरपंच कृष्णा सिंग पवार, माऊली मस्के, कबीर पवार, सोमनाथ तळतकर , शिवाजी बिरले, कांता शिंदे, अनिल उगले, बप्पा मस्के, लखन घोलप, विक्रम बायस, प्रल्हाद परिहार , शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अप्पासाहेब कांबळे, पत्रकार बंडु शिंगटे, माऊली दोबाले, प्रवीण काळे, निकरट सर , विषणु गव्हाणे,अरूण पवार ग्रामपंचायत कर्मचारी संतोष खापरे, अशोक दोबाले, गणेश वाघ आदी ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments