Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

“पत्रकारितेचा मान उंचावणारा सत्कार सोहळा – अंबड वार्ता कार्यालयात दिग्गज पत्रकारांचा गौरव”

 


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके


अंबड :पत्रकारितेच्या क्षेत्रात निष्ठा, परिश्रम आणि जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्याचा गौरवशाली सोहळा अंबड वार्ता कार्यालयात पार पडला. या सोहळ्यात अंबड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. संतोष जिगे. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

त्याचप्रमाणे, जालना जिल्हा  पत्रकार   राजेंद्र कळकटे यांचा देखील “अंबड वार्ता” तर्फे सन्मान करण्यात आला. दैनिक दुनियादारीचे उपसंपादक सुरेश शेठ भावले तसेच दैनिक भास्करचे ज्येष्ठ पत्रकार सोहेल चाऊस गीताराम मते पत्रकार व अजय  बुंदेलखंडे यांचा अंबड वार्ता परिवारातर्फे सन्मानित करण्यात आले.


पत्रकारितेच्या कार्याचा गौरव


या सत्कार प्रसंगी वक्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “पत्रकार हे समाजाचे आरसे आहेत. सत्याला आवाज देणे आणि जनतेचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे. आजचा हा सत्कार म्हणजे पत्रकारितेच्या निष्ठावंत कार्याला दिलेला मान आहे.”

उपस्थित मान्यवर

या सोहळ्यास अंबड वार्ता संपादक बळीराम राऊत, उपसंपादक आकाश जळके, कार्यकारी संपादक अनंता राऊत, प्रेस फोटोग्राफर गोविंद खरात यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी सत्कारमूर्तींना शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.


अल्पोपहाराने कार्यक्रमाला गोडी


संपूर्ण कार्यक्रम उत्साहात आणि कृतज्ञतेच्या भावनेने पार पडला. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मान्यवरांचा अल्पोपहार करून सन्मान करण्यात आला. यावेळी आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आणि उपस्थितांनी परस्पर संवाद साधत कार्यक्रमाची सांगता आनंदमय पद्धतीने झाली.

Post a Comment

0 Comments