अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
बुलेट चालवताना फॅन्सी नंबर प्लेट लावून तर कधी कानठळ्या बसवणाऱ्या कर्कश आवाजाने गाव गाजवणाऱ्या बुलेटचालकांवर अखेर तीर्थपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत चांगलीच झाडाझडती घेतली आहे. आज हद्दीत तब्बल १३ बुलेट मोटारसायकलवर कायदेशीर कारवाई करून पोलिसांनी रस्त्यांवर दहशत माजवणाऱ्या या चालकांना चांगलाच धडा शिकवला.
या मोहिमेमुळे गावोगावी चर्चा रंगली असून, “बुलेट चालवणं आता शौक नाही तर कायद्याच्या चौकटीत राहूनच करावं लागणार” असे स्पष्ट संदेश मिळत आहेत.
या कारवाईत एपीआय पवार, पीएसआय पठाडे, पोहवा माळी, पोहवा पोहर, पोशी वैराळ, गाडेकर, मंडलिक, राठोड यांच्यासह संपूर्ण पोलीस पथक उपस्थित होते. त्यांच्या या अॅक्शनमुळे गावातील नागरिकांनीही समाधान व्यक्त केले असून, “कर्कश आवाज करणाऱ्या बुलेट चालका विरुद्ध पोलिसांचा हा अॅक्शन म्हणजे सामान्य जनतेसाठी वरदानच ठरले” अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Post a Comment
0 Comments