मंठा/ प्रतिनिधी : मंठा येथील शासकीय गोदामातील गोदामपाल मारोती खोकले हे गोदामात साठवून ठेवलेल्या धान्याचा काळाबाजार करीत असून जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
मागील दोन-तीन महिन्यापूर्वी रुजू झालेल्या गोदाम पाल मारोती खोकले यांनी रेशनचा काळाबाजार करणाऱ्या माफीयांना हाताशी धरून त्यांच्याकडून अर्थपूर्ण हितसंबंध जोपासून गोदामातील स्वस्त धान्याचा काळाबाजार करण्याचा सपाटा लावला आहे.
यामध्ये काही स्वस्त धान्य दुकानदार सुद्धा सहभागी असल्याची चर्चा आहे. मंठा शहरात रेशनचा काळाबाजार करणाऱ्या माफीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी रेशनचा काळाबाजार करणाऱ्या गोदामपाल खोकले यांच्यावर कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.
ग्रामीण भागात अनेक कार्डधारकांचे बोटांचे ठसे स्वाईप होत नसल्यामुळे अशा अनेक कार्डधारकांचे रेशन गोदामपाल खोकले हे परस्पर काळ्या बाजारात विकत असून त्यामुळे अनेक कार्डधारकांना रेशन पासून वंचित राहावे लागत आहे.
Post a Comment
0 Comments