Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

विजेच्या धक्क्याने चिमुकल्या अभिषेकचा मृत्यू – तीर्थपुरी गाव शोकसागरात

 



घनसावंगी प्रतिनिधी / काकासाहेब कासार


घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी गावात गणेश विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या दुःखद घटनेने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे.


तीर्थपुरी येथील ज्ञानेश्वर गीताराम गिराम यांचा एकुलता एक मुलगा अभिषेक ज्ञानदेव गिराम (वय 14) हा आपल्या मित्रांसह गणेश विसर्जनाची तयारी करत होता. गणपतीची सजावट काढून व्यवस्थित ठेवण्याचे काम सुरू असताना, अभिषेक लाइटिंग वायर काढत असताना विजेच्या जोरदार धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.


गणेशोत्सवातील आनंदाच्या क्षणांना अचानक काळोखाने ग्रासले. गावभर हळहळ व्यक्त होत असून, अभिषेकच्या अकाली निधनाने गिराम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Post a Comment

0 Comments