अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
जालना :सोशल मीडियावर १ सप्टेंबर २०२५ रोजी गायीची कत्तल करतानाचा व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या कसायासह त्याच्या साथीदारांना अखेर सदर बाजार पोलिसांनी गजाआड केले आहे.
या प्रकरणी असलम महेमूद कुरेशी (रा. मंगळबाजार, जालना), सोफीयान शेख समद (रा. चमडाबाजार, जालना) आणि यासीन रशीद कुरेशी (रा. राजणी, ता. घनसावंगी) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आरोपींवर बीएनएस कलम २९९, ३(५) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हे दाखल आहेत.
फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी हैद्राबाद, संभाजीनगर, मानवत, पाथरी व परभणी येथे पथके पाठवली होती. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीद्वारे ठिकाण निश्चित करून अखेर पोलिसांनी ही कारवाई केली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संदीप भारती व स्थागूशाचे पंकज जाधव यांच्या नेतृत्वात करण्यात आली. डीबी पथकासह अनेक पोलिस कर्मचाऱ्यांनी या ऑपरेशनमध्ये सहभाग नोंदवला.
📌 सदर आरोपींवर संघटित गुन्हेगारी व आयटी अॅक्टचे कलमही वाढवण्यात आले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

Post a Comment
0 Comments