Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

बाजारवाहेगाव येथे कौटुंबिक वादातून महिलेसह सासूवर चाकू हल्ला – आधार हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

बदनापूर तालुक्यातील बाजारवाहेगाव येथे कौटुंबिक वादातून महिलेसह तिच्या सासूवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी संबंधित पीडित महिलेने पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला सौ. शारदा गजानन काळे (वय 35) या आपल्या कुटुंबासह बाजारवाहेगाव येथे वास्तव्यास आहेत. १५ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरासमोर झालेल्या वादातून संशयितांनी धारदार शस्त्राने महिलेवर हल्ला करून तीव्र दुखापत केल्याचे तिच्या फिर्यादीत नमूद आहे. हल्ल्यात पीडितेस गळा व हातावर गंभीर जखमा झाल्या तर हस्तक्षेप करणाऱ्या तिच्या सासू शोभाबाई काळे यांनाही पोटावर वार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

घटनेनंतर जखमींना नातेवाईकांनी तत्काळ उपचारासाठी जालना येथील आधार हॉस्पीटलमध्ये दाखल केले असून त्या सध्या ICU मध्ये उपचार घेत आहेत. या घटनेत संशयित मच्छिंद्र सांडू काळे व त्याचा मुलगा भागवत काळे यांनी शिवीगाळ व जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी पोलिसांनी फिर्याद नोंदवून कायदेशीर कार्यवाही सुरू केली असून पुढील तपास सुरु आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Post a Comment

0 Comments