अंबड वार्ता प्रतिनिध/ आकाश जळके
घनसावंगी आणि अंबड तालुक्यात महसूल व अन्न नागरी पुरवठा विभागातील तब्बल ४० टक्के पदे रिक्त असल्याने पंचनाम्यासह सर्व शासकीय कामकाजात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ कमी पडत आहे. घनसावंगी तालुक्यात तलाठ्यांची संख्या अपुरी असून महसूल विभागात अनेक पदे रिक्त आहेत.
अंबड तालुक्यात तर पुरवठा विभागाचा संपूर्ण कारभार केवळ एका नायब तहसीलदारावर अवलंबून आहे. पुरवठा निरीक्षक, गोदाम व्यवस्थापक व कनिष्ठ लिपिकांची पदे वर्षभरापासून रिक्त असल्याने रेशन कार्ड, नावे कमी-जास्त करणे, तक्रारी निवारण अशा कामांमध्ये मोठा विलंब होत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य डॉ. रमेश तारगे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदन दिले आहे. "दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना अनुदान वाटप करायचे असल्यास रिक्त पदे तातडीने भरावीत," अशी मागणी त्यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments