बंडु शिंगटे / घुंगर्डे हादगाव
आज मत्स्योदरी विद्यालय घुंगर्डे हादगाव येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री सोळुंकेसर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत शिक्षक दिन (स्वयंशासन दिन) व आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन तसेच आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.
शाळेत शिक्षक दिनानिमित्ताने स्वयंशासन शासन दिन साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना अध्यापन केले. नांद्रे सर यांनी उमाजी नाईक यांच्या कार्याविषयी व पटेकर सर यांनी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री सोळुंके सरांनी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच स्वयंशासन दिनानिमित्त शिक्षक म्हणून सहभागी विद्यार्थ्यांनी व शाळेच्या शिक्षकांनी स्वयंशासन दिनाविषयी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बांगरसर,श्री वाघमारे सर,श्री येटाळेसर,श्री पवार सर,श्री खरादसर,श्री गुरवसर,श्री कोटंबेसर,श्री लांडगेसर श्री मतीनशेखसर,श्री काथारसर श्री सैफ शेख सर व शिक्षकेतर कर्मचारी श्री मरकडसर,श्री काळुंकेसर,श्री पांढरे,श्री बोराडे सर्वांचे सहकार्य लाभले .

Post a Comment
0 Comments