Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

वन्यप्राण्यांकडून शेतपिकांची होणारी नासधुस थांबविण्यासाठी वन्यप्राण्यांना पकडून जंगलात (नैसर्गिक अधिवासात) सोडणाऱ्या शासन निर्णयाबद्दल समाधान- राजेश टोपे



 अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

जालना जिल्हयासह घनसावंगी व अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांची अक्षरश: नासाडी करुन पिके उध्दवस्त करण्याचा सपाटा वानर,माकडे,राणडुक्कर,हरीण व रुई गाय यांनी लावला आहे.वन्यप्राण्यांचा या उपद्रवामुळे मनुष्य हानी,मालमत्ता नुकसान,प्रचंड आर्थीक व मानसिक त्रास शेतकऱ्यांना होत आहे.यामुळे शेतकरी हातबल झालेला आहे.डोळयात पाणी आण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता म्हणून अशा सर्व शेतकऱ्यांनी राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे यांच्याकडे हे वन्यप्राणी पकडून जंगलात (नैसर्गिक अधिवासात) सोडणेबात विनंती केली होती.या विनंतीनुसार राजेश टोपे यांनी शेतपिकं,फळबाग,गावातील घरे व मालमत्तेचे नुकसान थांबविण्यासाठी आज वनमंत्री,मा.ना.श्री.गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत सविस्तर चर्चा होऊन वन्यप्राणी पकडून जंगलात (नैसर्गिक अधिवासात) सोडणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय झाला.


मागील काळात मराठवाडयात समाधान गिरी व त्यांच्या परिवाराकडून सातत्याने वानर व माकडे हे वन्यप्राणी पकडून जंगलात (नैसर्गिक अधिवासात) सोडण्यात येत होते.माकडे व वानर पकडण्यासाठी शासनाकडून प्रति माकड व वानर 400 रुपये प्रमाणे मानधन दिले जात होते.मागील दोन वर्षापासून धोरण बदल्याने ही प्रक्रिया बंद पडली. त्यामुळे शेतकऱ्यांना वानर व माकडांचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.त्यासंदर्भात या बैठकीत उपाय योजना म्हणून वानर,माकडे,राणडुक्कर,हरीण रुई गाय यांना पकडून जंगलात (नैसर्गिक अधिवासात) सोडण्यासाठी प्रति प्राणी 600 रुपये प्रमाणे मानधन देण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्याचे ठरले.शेतकऱ्यांचा हा जिव्हाळयाचा विषय निकाली काढल्याबद्दल मा. राजेश टोपे यांनी समाधान व्यक्त केले.


या बैठकीत आ.अर्जुनराव खोतकर,आ.तान्हाजी मुटकुळे,श्री.रविकांत तुपकर यांनी सहभाग घेऊन आपले मत मांडले.


यावेळी वन विभागाचे अपर मुख्य सचिव,प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख), अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक,श्री.समाधान गिरी यांच्यासह संबंधीत आधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments