शेतजमिनी खरडल्या, पिके वाहून गेली, जनावरांचेही नुकसान – शेतकरी आर्थिकदृष्ट्या हतबल
प्रतिनिधी : आकाश जळके
अंबड –मागील महिनाभरापासून अंबड तालुक्यात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह ढगफुटीच्या पावसामुळे शेतकरी वर्गावर मोठे संकट कोसळले आहे. सततच्या अतिवृष्टीमुळे शेकडो एकर शेती उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
जामखेड, रोहिलागड, पारनेर व ताडहदगाव सर्कल सर्वाधिक ग्रस्त या सर्कलमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांची शेतजमीन अक्षरशः खरडून गेली आहे. शेतकऱ्यांची पिके वाहून गेल्याने आता त्यांच्यासमोर आस्मानी संकट उभे ठाकले आहे.
उद्ध्वस्त पिके : लाखोचे नुकसान कापूस, तूर, सोयाबीन, मुग, बाजरी, मका यांसारखी खरीप पिके तसेच मोसंबी, डाळिंब, सीताफळ, पेरू व केळी यांसारखी फळपिके अतिवृष्टीमुळे पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांनी घाम गाळून उभी केलेली पिके काही क्षणांत पाण्याच्या तडाख्यात नष्ट झाली.
पाझर तलाव फुटले, शेतमाल वाहून गेला मठजळगाव व बनटाकळी येथील पाझर तलाव फुटल्याने परिसरातील शेती व शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले. पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे शेतजमिनी झोपल्या असून मातीचा कस निघून गेला आहे.
पशुधनाचेही नुकसान फक्त शेतीच नाही, तर शेतकऱ्यांचे पशुधनही या पुराच्या पाण्याने वाहून गेले. अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या-मेंढ्या मृत झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा मोठा स्त्रोत नष्ट झाला आहे.
शेतकरी हतबल – आर्थिक घडी विस्कटली
अतिवृष्टी व पुरामुळे शेतकरी आता पूर्णपणे हतबल झाला आहे. शेतीचे नुकसान, जनावरांचे नुकसान आणि पिके वाहून गेल्याने त्यांची आर्थिक घडी विस्कटली असून कुटुंब चालवण्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे.
ग्रामस्थांची मागणी : तातडीने पंचनामे व्हावेत
जामखेड, रोहिलागड, पारनेर, ताडहदगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी, अशी ठाम मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.
अंबड तालुक्यातील ढगफुटी व अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे जगणेच उद्ध्वस्त केले आहे. शासनाने तातडीने लक्ष घालून नुकसानभरपाई व मदतकार्य सुरू केल्याशिवाय शेतकरी वर्ग उभारी घेऊ शकणार नाही, अशी जनतेची आर्त हाक आहे.
यावेळी उपस्थितश्री. रमेश भाऊ पैठणे (मा. सभापती पस अंबड )श्री. प्रदीप पवार (भाजपा अंबड तालुका अध्यक्ष ) श्री. सौरभ कुलकर्णी (भाजपा अध्यक्ष अंबड शहर मंडळ )युवा नेते डॉ. राहुल डोंगरे(जिल्हा सरचिटणीस भाजपा जालना ), डॉ. नंदकिशोर पिंगळे (मा. जिप सदस्य ), डॉ. रामकिसन जाधव श्री. धनंजय चावरे श्री. साईनाथ उकार्डे,(सरपंच कानडगाव /झोडेगाव तथा तालुका सरचिटणीस भाजपा अंबड )श्री. विठ्ठल सिंग राणा, सदानंद राऊत, बाळू शहाणे,संजय सानप (सरपंच पानेगाव )गंगाधर वराडे श्री. संतोष सपकाळ (सरपंच दहिपुरी ), श्री. रमेशमामा शहाणे,श्री. संदीप दादा खरात,रमेश बुदलखंडे श्री. सचिन जाधव, जितू शेरे,बाबासाहेब गायके, गोकुळ तावरे, शरद उकार्डे,माळोदे मामा (सरपंच दूधपुरी ), अंकुश निकाळजे (सरपंच मठ जळगाव )राहुल मुंजाळ,भगवान इंगळे (सरपंच बठाण )राम गाढेकर, बद्री भाऊ डोखळे (उप सरपंच मठ जळगाव )अण्णासाहेब डोंगरे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तथा शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते....

Post a Comment
0 Comments