Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अतिवृष्टीमुळे पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

 


बंडु शिंगटे/ घुंगर्डे हादगाव 


गेल्या काही दिवसांपासून झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्याचा गंभीर फटका पैठण परिसरातील अनेक भागांना बसला आहे.या पुरस्थितीचा परिणाम शहरातील श्री जगद्गुरु अध्यात्मिक गुरुकुल तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था यांच्यावरही झाला आहे.


या दोन्ही संस्थांमध्ये सुमारे ५० विद्यार्थी शिक्षण घेत असून ते संस्थेतच वास्तव्यास असतात.पुराच्या पाण्यामुळे संस्थेच्या परिसरात पाणी शिरले आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य,वह्या,पुस्तके तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंचे मोठे नुकसान झाले.या परिस्थितीत विद्यार्थ्यांपुढे शिक्षण पुन्हा सुरू करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले.


ही सामाजिक जबाबदारी ओळखून श्रीनाथ हायस्कूल तसेच शांताई सामाजिक युवा प्रतिष्ठान आणि शांताई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था,वडीगोद्री यांच्या वतीने पुरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांना नवीन वह्या,पुस्तके,पेन,गणवेश आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.


यावेळी प्राचार्य शिवाजी पठाडे यांनी सांगितले की,“गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे आमच्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले.त्यांच्या वह्या,पुस्तके आणि इतर शैक्षणिक साहित्य पाण्यात भिजून गेले.अशा कठीण परिस्थितीत या मदतीमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलले आहे आणि त्यांचा शिक्षणावरील आत्मविश्वास परत आला आहे.”


या वेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू छल्लारे यांनी सांगितले की,“आपत्तीच्या काळात शिक्षण खंडित होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना ही मदत देण्यात आली आहे.शिक्षण हेच भविष्यातील बळ आहे आणि या मुलांच्या भविष्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.अशा सामाजिक कार्यात प्रतिष्ठान नेहमीच अग्रभागी राहील.”


या कार्यक्रमास प्राचार्य शिवाजी पठाडे, पर्यवेक्षक सिकंदर थोरात,प्रा.संतोष गव्हाणे,सुनील चितळे,रामनाथ कानडे,तुकाराम वाकडे,उद्धव भुकेले,वाल्मीक घोडके तसेच श्री जगद्गुरु अध्यात्मिक गुरुकुल चे प्रमुख सिद्धेश्वर महाराज चोरमले आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष गणेश महाराज तावरे यांच्यासह संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments