Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

घुंगर्डे हादगाव: गणपती नगर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थ ठोकणार कुलुप

 


प्रतिनिधी घोंगड हादगाव

अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव ग्रामपंचायत अंतर्गत गणपती नगर तांडा येथील जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे. घुंगर्डे हादगाव येथुनच जवळच असलेल्या गणपती नगर तांडा येथे इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत जिल्हा परिषद शाळा असून या शाळेत एकच शिक्षक असल्याने शाळेची पटसंख्या १९ आहे. एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ग्रामस्थ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांनी जिल्हा परिषद जालना शिक्षणाधिकारी संगीता भागवत यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, गणपती नगर तांडयावर एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. लवकरात लवकर शाळेवर शिक्षकाची नियुक्ती करण्यात यावी. नसता ग्रामस्थांच्या वतीने लवकरच शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनात शिक्षक देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे जर शाळेला शिक्षक नाही दिले तर शाळेला कुलूप ठोकणार आहे. या निवेदनावर सतीश होंडे, अनिल भाऊ मस्के पाटील व ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Post a Comment

0 Comments