जालना – दि. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यंदाच्या सहा महिन्यांत तब्बल ८.५ कोटी रुपयांचा नफा कमवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. बँकेच्या या प्रगतीमागे अध्यक्ष सतीश भाऊ टोपे यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचे व कुशल मार्गदर्शनाचे मोठे योगदान आहे.
ग्राहकसेवेला केंद्रबिंदू मानत बँकेने आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक अभिनव उपक्रम राबविला आहे — “मिस कॉल सिस्टीम”. फक्त ९८९८६८१९९९ या क्रमांकावर मिस कॉल दिल्यानंतर ग्राहकांना आपल्या खात्याचा बॅलन्स घरी बसल्या कळणार आहे.
ही सेवा विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी वर्गासाठी वरदान ठरणार आहे. पूर्वी बँकेत रांगेत उभे राहून बॅलन्स तपासण्याची वेळ येत होती, ती आता संपली आहे. या उपक्रमाचा विचार स्वतः सतीश टोपे यांनी मांडला व आशिष टीमच्या सहकार्याने ही आधुनिक सेवा विकसित करण्यात आली.
बँकेच्या या ग्राहकहितैषी पावलाचे सर्वत्र कौतुक होत असून, “राष्ट्रीय बँकांनाही मागे टाकणारी सुविधा” अशी या योजनेची चर्चा सुरू आहे.
सतीश टोपे यांनी सर्व ग्राहकांना आवाहन केले आहे की, “बँकेने सुरू केलेल्या या सोयीचा लाभ प्रत्येक खातेदाराने घ्यावा आणि डिजिटल बँकिंगच्या नव्या युगात पाऊल टाकावे.”
📞 मिस कॉल क्रमांक: 98 98 68 19 99
💰 प्रॉफिट: 8.5 कोटी रुपये
🏦 बँक: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जालना

Post a Comment
0 Comments