Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

अंबड नगर परिषद नगराध्यक्ष खुला वर्ग; महिला सोडतीनंतर भाजपचा महात्मा फुले चौकात जल्लोष!

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 


आज झालेल्या अंबड नगर परिषद नगराध्यक्ष खुला वर्गाच्या महिला सोडतीनंतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा फुले चौकात जल्लोष साजरा केला. सोडतीचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. चौकात घोषणाबाजी, फटाके आणि ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष साजरा करण्यात आला.



या वेळी जिल्हा उपाध्यक्ष दीपक भैया ठाकूर, तालुका अध्यक्ष प्रदीप पवार, विठ्ठलसिंग राणा, ओमप्रकाश उबाळे, गंगाधर वराडे, बळीराम राऊत, द्वारकादास जाधव, राजेंद्र डहाळे, औदुंबर बागडे, बबन बुंदेलखंडे, तारीख चाऊस, लक्ष्मण बेदे, रमेश शहाणे, सुनील बीडे, डॉ. राजेंद्र ठोसर, रावसाहेब बिडकर, बाळू खरात, सुरेश गुडे, धनराज ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.



भाजप कार्यकर्त्यांनी “भारत माता की जय!, जय श्रीराम!, भाजप विजय असो!” अशा घोषणांनी चौक दुमदुमवला. वातावरणात उत्साह, आनंद आणि विजयाचा जल्लोष दरवळला. 🔥



Post a Comment

0 Comments