*नगर परिषद निवडणूक मतदान प्रक्रियेच्या पूर्व तयारीची जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची अंबड व भोकरदन येथे पाहणी*
जालना दि.1(जिमाका) : जालना जिल्ह्यातील परतुर अंबड व भोकरदन येथील नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 2 डिसेंबर, 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, या तयारीचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांनी आज अंबड व भोकरदन शहराचा दौरा करून तेथील मतदान प्रक्रिया तयारीचा सविस्तर आढावा घेवून अधिकारी व कर्मचारी यांना सूचना दिल्या.
यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी अंबड, भोकरदन, तहसीलदार अंबड विजय चव्हाण, तहसीलदार भोकरदन डी. एम. काकडे, पोलीस निरीक्षक अंबड व भोकरदन यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल व पोलीस अधीक्षक श्री. बंसल यांनी आज अंबड व भोकरदन येथे मतदान साहित्य व स्विकृती कक्षाची पाहणी केली. तसेच मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान पथकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या साहित्याची तपासणी केली. तसेच विविध मतदान प्रक्रिये दरम्यान राज्य निवडणूक आयोगास वेळोवेळी सादर करावयाची प्रपत्रे व अहवाल याविषयी आढावा घेतला. यावेळी मतदान केंद्रांची पाहणी करुन मतदारांसाठी मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचे योग् नियोजन करावे अशा सुचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या.
मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून, सर्वांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
****


Post a Comment
0 Comments