कोतलवाडी शिवरात गांजाच्या शेतीवर पोलिसाचा छापा अंबड तालुक्यातील कोचरवाडी गावा भागातील शेतात गांजाच्या शेतीवर अंबड पोलीस व एटीएस पथकाने कारवाई करून एक कोटीच्या गांजाची झाडे पकडली आहेत याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई आज चार डिसेंबर रोजी उशिरा करण्यात आली आहे अंबड तालुक्यातील कौतलवाडी या गावात एका व्यक्तीने गांजाची शेती केली असून सध्या गांजाची काढणी सुरू आहे अशी माहिती वरून सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगेवाड पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे सहायक फौजदार शेख अख्तर पोलीस हवालदार विनोद गडदे मारुती शिवरकर कैलास कोरेवाड यशवंत मुंडे राधाकृष्ण हरकळ दीपक भवरे यांनी कौतलवाडी शिवार येथे जाऊन शोध घेतला ढवळीराम बारकू सरावंडे यांच्या शेतात गट क्रमांक 787 कोचरवाडी येथे जवळपास चार कुंटल गांजाची झाडे पाला फुले काढणी करताना ती सुखी सुखविताना तसेच उभे झाडे असा मुद्देमाल मिळून आल्याने पंचनामा करून तो ताब्यात घेण्यात आला हा मुद्देमाल सुमारे एक कोटीच्या अधिक असू शकतो असे सांगण्यात येत आहे ही कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य निपाणी उपविभागी पोलीस अधिकारी सिद्धेश्वर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे अंबड पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कोतलवाडी शिवरात गांजाच्या शेतीवर पोलिसाचा छापा
December 04, 2025
0


Post a Comment
0 Comments