ॲड.संजय काळबांडे यांची राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जालना जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती.
राष्ट्रवादी पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार शेतकरी, कष्टकरी, नवतरुण, माता-भगिनी यांच्या हक्कासाठी जनसेवक म्हणून सदैव कार्यतत्पर असेल: ॲड.संजय काळबांडे
अंबड /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या तालमीत व आदर्श कार्यपद्धतीत तयार झालेले माजी जिल्हा परिषद सदस्य, अभ्यासू, विधीतज्ञ ॲड.संजय काळबांडे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जालना जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
अंबड येथे आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री राजेश टोपे यांच्यासह पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जालना जिल्हाध्यक्ष पदाची धुरा अड.संजय काळबांडे यांच्याकडे सोपवण्यात आली.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यासह,शेतकरी कष्टकरी, महिला, नवतरुण यांच्यासाठी जनसेवक म्हणून न्याय देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याची ग्वाही नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ऍड. काळबांडे यांनी याप्रसंगी दिली.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे मावळते जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, माजी सभापती सतीश होंडे, शिवप्रसाद चांगले, नगरसेवक अफरोज पठाण, संदीप खरात,अर्जुन भोजने,जितेंद्र बुर्ले यांच्यासह पंचक्रोशीतील राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲड. संजय काळबांडे यांच्या रूपाने निष्ठावंत व अभ्यासू व्यक्तीस राजेश टोपे यांनी योग्य न्याय दिला अशी भावना उपस्थितत्या मध्ये बोलली जात होती यामुळे राष्ट्रवादी पक्षाची मोठ्या प्रमाणात बळकटी होईल असा विश्वास उपस्थित जनसामान्यांमध्ये दिसून येत आहे.

Post a Comment
0 Comments