*
विवेक घारे यांच्या नियुक्तीने काँग्रेसला नवी ऊर्जा - मा.आ. राजेश राठोड........
मंठा/ प्रतिनिधी : मंठा तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी विवेक घारे यांची नियुक्ती झाल्याबद्दल मा.आमदार राजेश राठोड यांच्या निवासस्थानी त्यांचा जंगी करण्यात आला. यावेळी माजी आमदार धोंडीराम राठोड यांची उपस्थिती होती.
काँग्रेस पक्षाने दिलेल्या जबाबदारीनुसार विवेक घारे हे तालुक्यातील संघटन मजबूत करण्यासाठी काम करतील, असा विश्वास यावेळी राजेश राठोड यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, विवेक घारे हे अभ्यासू आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व आहे, मंठा तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते प्रभावीपणे काम करतील. पक्षाने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाला ते नक्कीच पात्र ठरतील असे सांगितले.
नवनियुक्त अध्यक्ष विवेक घारे यांनी आ. राजेश राठोड आणि पक्षश्रेष्ठीचे आभार मानले.
याप्रसंगी तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष निळकंठ वायाळ, बाजार समितीचे संचालक पंजाबराव केंधळे, प्रकाश घुले, अशोक चव्हाण, सुरेश वाव्हळे, नितीन राठोड, यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments