अंबड (प्रतिनिधी ) - आज दिनांक 25 जुलै 2026 रोजी आषाढी एकादशी निमित्त लाखोच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपूर मध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असे म्हणतात.
कै.दत्ताजी भाले शैक्षणिक संकुलात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्माई यांची पालखी मोठ्या थाटामाटात सजवण्यात आली. विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भारतीय संत परंपरे नुसार वारकरी वेशभूषा विविध संतांची वेशभूषा साकारून वारकरी संप्रदायाप्रमाणे सहभागी झाले. याप्रसंगी संस्कार केंद्रतील श्रीमती वाघमारे मॅडम यांच्या हस्ते व सर्व शिक्षकवृंदांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भगवे झेंडे टाळ मृदंग मुखात अखंड हरिनामाचे नामस्मरण करीत दिंडी शाळेच्या प्रांगणातून राऊत नगर, कोर्ट रोड वडगावकर हॉस्पिटल ,मत्स्योदरी ज्ञानमंदिर, तसेच रमेश शहाणे यांच्या घरात पासून विठ्ठल रुक्माई मंदिर या ठिकाणी पोहोचली. दिंडी चालत असताना विद्यार्थ्याने फुगडी विविध ,लेझीम प्रात्यक्षिक ,पावली ,विठुरायांचा नामस्मरण करीत भगवंताच्या भेटीचं आनंद घेतला. विविध ठिकाणी माता पालक यांनी पालखीचे पूजन करून पुष्पवृष्टी करण्यात आले. भक्तिमय वातावरणामुळे परिसर आनंदाने दुमदुमून गेले.
यावेळी व्यासपीठावरती शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य मा.श्री.दीपक भैया ठाकूर( जिल्हा उपाध्यक्ष - भा ज पा जालना) डॉक्टर राजेंद्रजी भाला, अंबड नगर परिषदचे नगराध्यक्ष माननीय श्री केदारजी कुलकर्णी, राजेंद्रजी डहाळे, घुगे सर, माधुरीताई बागडे, सुषमाताई भाला, नगरसेवक बाळू शहाणे, हनुमानजी धांडे, भाई जामदरे , शिवप्रसादजी लाहोटी, भाजपा नेते रमेश शहाणे,बाळासाहेब पांढरे , नरेश बुंदलखंडे,बांगर सर , विनायक सर, तसेच कॉलनीतील प्रतिष्ठित उद्योजक व नामांकित भक्तगण असे सर्व मान्यवर तसेच विद्यार्थी सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी शिशुवाटिका प्रमुख श्रीम. प्रणिता वाघमारे ताई , सौ. रेखा देशमुख मॅडम , श्रीमती निशा जपे मॅडम व पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींनी भक्ती गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक कलोपासक मंडळ प्रमुख श्री.अनिल चव्हाण सर यांनी केले. विद्यार्थ्यांनी विविध भक्ती गीते अभंग धार्मिक भारुडे सादर केली. यानंतर अध्यक्षीय समारोप करताना मा.श्री.दीपक भैय्या ठाकूर म्हणाले विद्यार्थ्यांमध्ये अध्यात्मिक व धार्मिक वारसा जपवणूक व्हावी व विद्यार्थ्यांमध्ये एकात्मिक समरसता निर्माण व्हावे यासाठी दिंडी तसेच धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. हा मोलाचा संदेश आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजावा यासाठी आपल्या शाळेच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येते. त्यानंतर महाआरतीसाठी मा श्री.दीपक भैय्या ठाकूर व मा श्री.डॉ.राजेंद्र भाला सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. विनायक भैया चोथे यांनी साबुदाणा खिचडी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन दिली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी रांगेत विठ्ठल- रुक्माई चे दर्शन घेऊन फराळ घेतले.कार्यक्रमाची सांगता शांती मंत्राने झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन- श्री. गजानन उबाळे सर यांनी केले. आभार प्रदर्शन - श्री अनिल चव्हाण सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंदांनी परिश्रम घेतले. यावेळी परिसरातील सर्व माता पालक उपस्थित होते.


Post a Comment
0 Comments