Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

डॉ. प्रमोद कुमावत यांचा गौरव – सावित्रीबाई फुले विद्यालयात सत्कार समारंभ संपन्न

अंबड वार्ता 


तालुका प्रतिनिधी आकाश जळके 


अंबड – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे (SCERT) मार्फत राबविण्यात येणाऱ्या पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम मंडळाच्या (FLN) इंग्रजी विषयासाठी राज्यस्तरीय तज्ज्ञ म्हणून जालना डायट कॉलेजचे आदिव्याख्याता डॉ. प्रमोद कुमावत यांची निवड झाल्याबद्दल सावित्रीबाई फुले प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, अंबड यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

     या निवडीमुळे जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राला मोठा सन्मान प्राप्त झाला असून, राज्यस्तरीय शैक्षणिक धोरणनिर्मितीत डॉ. कुमावत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांच्या कार्याची ही निवड दखल घेण्यासारखी असून अनेक शिक्षकांसाठी ती प्रेरणादायी ठरत आहे.

         या गौरवप्रसंगी बोंधलपुरी येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मनोहर पटेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले विद्यालय, अंबड येथील सहशिक्षक श्री. आसाराम भद्रे, दत्ता शेरे, भागवत खरात, मुरली सहारे, विठ्ठल खरात, विलास जाधव आणि प्रशिक खंडारे यांनी आपली उपस्थिती दर्शवली.

      कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साही वातावरणात पार पडले. उपस्थित शिक्षकांनी डॉ. प्रमोद कुमावत यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments