अंबड तालुका /प्रतिनिधी आकाश जळके
जागतिक योग दिनानमित्त योग शिक्षक गजानन पांडुरंग पुरी, यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालगाव येथे शाळेचे मुख्याध्यापक महावीर शेलार, नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणारे उपक्रमशील तंत्रस्नेही शिक्षक नरेंद्र रत्नपारखे, प्रदीप जाधव, चक्रपाणी मुळे, भीमराव ढाकणे, सारिखा इंगळे, अश्विनी चौधरी, शितल वानखेडे आदींच्या मार्गदर्शनाखाली व अंबड पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल रामेश्वर मूळक, सामाजिक कार्यकर्त्या, ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.आशाताई गाढेकर, सरपंच दत्ता जाधव, राजमुद्रा अभ्यासिकाचे संचालक गणेश मुळे, मा.सरपंच शामसुंदर मुळे, बाळराजे जाधव, प्रा.गणेश श्रीमंतराव मुळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कारभारी मस्के, उपाध्यक्ष दिगंबर जाधव, भगवान खंडागळे, ऋषी इंगळे, हनुमान मुळे, गणेश मुळे, सुखदेव खंडागळे, कृष्णा मिसाळ, अंगणवाडी सेविका इंदुमती गुढेकर, आशाताई मीना साबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सूर्य नमस्कार स्पर्धेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले असून सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्तेओमकार प्रतिमेस पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सूर्यनमस्कार स्पर्धेत प्रथम दिव्या किरण साबळे, द्वितीय वैष्णवी दत्ता मुळे, तृतीय यश नंदू मस्के, चतुर्थ श्रद्धा खंडागळे, आनंद साबळे, आरती मुळे, शिवराज इंगळे, आदी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षी देऊन गौरविण्यात आले असून सूक्ष सूक्ष्म हालचाली, सूर्यनमस्कार, त्याचे बारा प्रकार मंत्रोच्चारात, ताडासन, वृक्षासन आदी आसने व अनुलोम-विलोम दीर्घ श्वसन, आधी प्राणायाम घेण्यात येऊन त्याची व्याख्या, निषेध,कृती, लाभ,दक्षता, घ्यावयाची काळजी, जागतिक योग दिनाचे महत्त्व, इतिहास, योग साधनेचे महत्त्व, 21 जून या दिवसाचे महत्त्व, योग म्हणजे काय, स्पर्धा परीक्षेचे महत्व आदिविषयी सविस्तर माहिती ॲड. आशाताई गाढेकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल, रामेश्वर मुळक, मुख्याध्यापक महावीर शेलार, उपक्रमशील शिक्षक नरेंद्र रत्नपारखे, योगशिक्षक गजानन पांडुरंग पुरी, प्रदीप जाधव, आदींनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले असून होतकरू गरीब कुटुंबातील दोन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ॲड. आशाताई गाढेकर यांनी घेतली असून त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Post a Comment
0 Comments