Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौरा



राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांसाठी परदेश अभ्यास दौरा –2025/26 

कृषी विभागाच्या वतीने राज्यातील प्रगतशील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देणे, उत्पादन क्षमता वाढवणे, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील शेतीतील प्रगत प्रथा अनुभवण्यासाठी परदेश अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 2025_26 या वर्षात एकूण 180 शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे, ज्यात प्रत्येक जिल्ह्यातून किमान 1 महिला शेतकरी व एक पुरस्कार प्राप्त शेतकरी सहभागी होतील.

लाभार्थी निवडीचे प्रमुख निकष:

1. अर्जदार स्वतः हा शेतकरी असावा.

2. मागील सहा महिन्याच्या आतील सातबारा उतारा व आठ प्रमाणपत्र आवश्यक

3. शेतकऱ्याचा प्रमुख उत्पन्नाचा स्त्रोत हा शेती असावा त्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल. 

4. कृषी विभागाच्या योजनांतर्गत प्रशिक्षण पुरस्कार प्राप्त केलेले शेतकरी प्राधान्याने पात्र ठरतील.

5. शेतकऱ्याचा फार्मर आयडी बंधनकारक आहे. 

6. शेतकऱ्याचे आधार कार्ड अनिवार्य आहे. 

7. एका कुटुंबातील फक्त एकाच सदस्याला दौऱ्याची संधी मिळेल त्यासाठी कुटुंब प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. 

8. वयोमर्यादा: २५ वर्षे असावी कमाल वयो मर्यादेची अट नाही परंतु शारीरिक दृष्ट सक्षम असल्याचा एमबीबीएस डॉक्टरचा दाखला आवश्यक आहे.

9. शेतकऱ्याकडे वैध पासपोर्ट असणे आवश्यक आहे. 

10. शेतकरी शासकीय निम शासकीय सेवेत नसल्याचे घोषणापत्र सादर करावे.

11. शेतकऱ्यांनी यापूर्वी कोणत्याही केंद्र किंवा राज्य शासनाच्या योजनेमधून विदेश दौरा केलेला नसावा. 

12. निवडीचे सर्व अधिकार राज्यस्तरीय निवड समितीस राखीव असतील.

13. आरोग्यदृष्ट्या परदेश प्रवासास सक्षम असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक राहील

*अनुदानाचे दर*

शेतकऱ्याला जास्तीत जास्त एक लक्ष रुपये किंवा खर्चाच्या 50% रक्कम अनुदान देय राहील यावर येणारा खर्च शेतकऱ्यांनी स्वतः करायचा आहे.

या परदेश अभ्यास दौऱ्यामार्फत शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील नविन पद्धती, प्रक्रिया तंत्रज्ञान, मार्केटिंग कौशल्ये यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळणार असून, त्याचा उपयोग स्थानिक स्तरावर शेतीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी होईल.

तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 राहील.





Post a Comment

0 Comments