Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

आ.अर्जुनराव खोतकर यांची महाराष्ट्र राज्य मंत्री मंडळात वर्णी लागावी

 



अंबड/प्रतिनिधी 

शिवसेनेचे नेते तथा जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार अर्जुनराव खोतकर यांची राज्य मंत्री मंडळात वर्णी लागावी त्याच बरोबर जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणूनही त्यांची नियुक्ती व्हावी अशी मनोभावे प्रार्थना अंबड येथील युवा सेनेचे पदाधिकारी विष्णू सोनवणे यांनी जालना जिल्ह्याचे आराध्य दैवत असलेल्या श्री मत्स्योदरी देवीच्या चरणी केली आहे.यासाठी ते संपूर्ण श्रावण महिन्यात पायात काहीच न घालता अनवाणी राहणार आहेत.

काल (ता.24) गुरुवारी सायंकाळी विष्णू सोनवणे यांनी श्री मत्स्योदरी देवीची आरती करून देवी चरणी माथा टेकून सर्व सामान्यांच्या मदतीसाठी धावून येणारे भाऊ म्हणजेच आ.अर्जुनराव खोतकर यांची राज्य मंत्री मंडळात वर्णी लागावी तसेच त्यांची जालना जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती व्हावी अशी प्रार्थना केली.या वेळी त्यांनी आपण श्रावणमध्ये पूर्ण महिनाभर पायात काहीच न घालता अनवाणी राहणार असा संकल्पही व्यक्त केला आहे.

यावेळी श्री.सोनवणे यांच्यासह आ.अर्जुनभाऊ खोतकर समर्थकांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments