अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
पैठण (दि. 30 जुलै 2025) – नाथसागर जलाशय (जायकवाडी धरण) सध्या 90.13% क्षमतेने भरले असून, पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे वाढत्या आवक पाहता उद्या, दिनांक 31 जुलै 2025 रोजी दुपारी 3:00 ते 3:30 दरम्यान गोदावरी नदी पात्रात 9432 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
यासाठी धरणाचे एकूण 18 दरवाजे प्रत्येकी 0.5 फुटाने उघडण्यात येणार आहेत. नदीपात्रातील विसर्ग हे हवामानानुसार कमी किंवा जास्त करण्यात येईल, असे जायकवाडी पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, कोणीही नदी पात्रात प्रवेश करू नये, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, जायकवाडी पाटबंधारे विभाग, नाथनगर (पैठण) यांनी केले आहे.

Post a Comment
0 Comments