अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
भारतीय संस्कृतीत नागपंचमी या सणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भारत आणि नेपाळ या देशात या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी ही पूजा केली जाते. चांदी,दगड, लाकूड किंवा चित्रापासून बनवलेल्या नाग किंवा सर्पदेवतेला दूध आणि आदरपूर्वक स्नान किंवा अभिषेक घालून आशीर्वाद घेतली जातात. या सणाच्या दिवशी नागराजाची पूजा करण्याचा हा आजचा दिवस म्हणजेच नागपंचमी. या दिवशी कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्यामुळे त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली. नागपंचमी निमित्त मारोती मंदिर भालगाव येथे बाऱ्यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असून अनेक लोक यामध्ये सहभागी होतात. यावेळी नाथा इंगळे, पांडुरंग पुरी, सुरेश मुळे, कचरू चौरे, कृष्णा मिसाळ, दिनेश खंडागळे, दत्ता चौरे, भगवान खंडागळे, कृष्णा इंगळे, भाऊराव गायकवाड, रघुनाथ मोरे, गजानन काळे, शामराव गायकवाड आदि भालगाव येथील आरबडी मंडळी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments