Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मुख्यालय सोडा की खुर्ची – अंबडमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांवर खदखद! काँग्रेसचा अल्टिमेटम, नाही तर 14 ऑगस्टपासून आमरण उपोषण




अंबड वार्ता आकाश जळके 

"शासकीय पगार अंबडचा, पण वास्तव्यास डॉक्टर बाहेरचा?" – अशा रोषाने अंबड शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मुख्यालयाबाहेर वास्तव्यास विरोध दर्शवत प्रशासनाला थेट अल्टिमेटम दिला आहे.

अंबड उपजिल्हा रुग्णालयात सध्या बहुतांश वैद्यकीय अधिकारी मुख्यालयात वास्तव्यास राहत नाहीत, तर शहराबाहेरून ये-जा करत आहेत. परिणामी, दुर्घटनांच्या वेळी एकच डॉक्टर रात्रपाळीत उपलब्ध असतो, आणि अंबडसारख्या मोठ्या शहरात ही परिस्थिती धोकादायक बनली आहे.

आपत्कालीन प्रसंगी रुग्णांचा लोट वाढल्यास फक्त खासगी डॉक्टरांकडेच उपचाराची धाव, असे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे शासनाचा "24x7 आरोग्य सेवा" दावा फोल ठरत असल्याची टीका स्थानिकांनी केली आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते,

 “शासकीय डॉक्टरांनी मुख्यालयात वास्तव्यास राहणे हे केवळ बंधनकारक नव्हे, तर नैतिक जबाबदारी आहे. अन्यथा प्रशासन व वैद्यकीय अधीक्षक हे रुग्णांच्या जीवितास जबाबदार राहतील.”

यासंदर्भात लेखी निवेदन वैद्यकीय अधीक्षकांना सादर करण्यात आले असून, 14 ऑगस्ट 2025 पासून उपजिल्हा रुग्णालयासमोर काँग्रेसच्यावतीने आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेतली नाही तर या आंदोलनाचे रूप अधिक तीव्र होणार, अशी स्पष्ट चेतावणी देण्यात आली आहे.

या निवेदनात   जाकेर डावरगांवकर,रविंद्र डोंगरे,संभाजी गुडे,वोख जावेद,जफर पठाण,वसिम शेख ,बाबासाहेब घोलप यांच्या स्वाक्षऱ्या आहेत

Post a Comment

0 Comments