Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

गरीब कुटुंबातील मुलीचा प्रेरणादायी प्रवास — डॉ. आयशा खान यांना बीएचएमएस पदवी प्राप्त, अनेक मान्यवरांनी केला गौरव

 




अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

 – कठोर परिश्रम, जिद्द आणि वडिलांच्या आधारावर घडलेली यशोगाथा! डॉ. आयशा  पठाण यांना आज औरंगाबाद येथील डॉक्टर भगवान होमिओपॅथी कॉलेज, संभाजीनगर येथून बी. एच. एम. एस. (BHMS) पदवी प्रदान करण्यात आली.

डॉ. आयशा पठाण या कदीर पठाण, सेक्रेटरी – रोहिलागड यांच्या कन्या आहेत. जामखेड येथील जिल्हा परिषद शाळेत दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आयशा यांनी बारावीचे शिक्षण मौलाना आझाद महाविद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी वैद्यकीय शिक्षणाची वाट धरली आणि 2024 मध्ये प्रथम श्रेणीत डॉक्टर पदवी प्राप्त केली.

वडील कदीर पठाण हे मध्यवर्ती सहकारी बँकेत कार्यकारी सोसायटी सेक्रेटरी पदावर कार्यरत असून, त्यांच्या अथक मेहनती, आधार व प्रोत्साहनामुळे आज ही घडी उजळून निघाली आहे.

या यशाबद्दल आ. नारायण कुचे, देविदास कुचे (सभापती), अवधूत नाना खडके आणि अंबड वार्ता संपादक बळीराम राऊत यांनी डॉ. आयशा खान यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा दिल्या.

एक सामान्य कुटुंबातून आलेल्या मुलीने डॉक्टर बनून दाखवलेला हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. समाजात आपले योगदान देण्याची नवी उमेद आणि संकल्प घेऊन डॉ. आयशा पठाण आता वैद्यकीय क्षेत्रात पुढील वाटचालीस सज्ज आहेत.

Post a Comment

0 Comments