Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

"गावात 'ग्रामपंचायत' – पण कामं 'खाजगी खोलीत'! शासकीय इमारत झाली फक्त फोटोसाठी!"




अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

कुक्कडगांव (ता. अंबड, जि. जालना)

लोकशाहीत ग्रामपंचायत ही गावच्या विकासाची पहिली पायरी असते... पण कुक्कडगांवची ग्रामपंचायत मात्र या संकल्पनेला फाटा देत 'फोटोसेशन सेंटर' म्हणून उदयास आली आहे. "कार्यालय गावात – पण कारभार अंबडमधील खाजगी खोलीत" हे वास्तव समोर आल्यावर ग्रामस्थ चांगलेच पेटले आहेत.

"ऑफिस इथे, काम तिथे – लोकांचा वेळ फुकट इथे!"

ग्रामपंचायतचे अधिकृत कार्यालय गावाच्या हद्दीत असले तरी, तेथे ना सचिव ना कामकाज ना नोंदी! ग्रामपंचायतीचे सर्व व्यवहार अंबडमधील एका खाजगी खोलीत चालवले जात आहेत. लोकांनी कार्यालयात चक्कर मारल्या तरी ‘येईल सर, बसायला खुर्ची नाही’ असा प्रतिसाद मिळतो.

"हम भी क्या याद रखेंगे ये दौलत वाले,

सरकारी इमारत है... मगर काम खुदा के हवाले!"

 महापुरुषांचे फोटो, हार, आणि पुष्पवृष्टीला मात्र वेळ आणि निधी दोन्ही!

या कार्यालयात फक्त जयंत्या आणि फोटो लावण्याचे कार्यक्रम वेळेवर होतात. हार-फुलं वेळेवर पोहोचतात, पण सामान्य माणसाचं काम मात्र अंबडला धाव घ्यावी लागते.

 "न जनता की सुनवाई, न दस्तावेज़ का ठिकाना,

हैरत है, ये ग्रामपंचायत है या सिर्फ़ बहाना?"

"शासकीय निधीचा 'साजशृंगार', पण ग्रामस्थांची कामं अधांतरी!"

दरवर्षी कार्यालयाच्या देखभालीसाठी लाखो रुपये खर्च होतात, पण कार्यालयात दिवा लावण्यासाठीही कधी वीज नाही, आणि कामकाजासाठी कर्मचाऱ्यांचा थांगपत्ता नाही. रेकॉर्ड कुठे आहे, हजेरी कुठे होते, हे कोणालाच माहीत नाही.

ग्रामस्थांचा संताप – 'जयंत्यांचा खर्च थांबवा, लोकसेवा सुरू करा!'

ग्रामस्थांनी जोरदार मागणी केली आहे की:

ग्रामपंचायत कार्यालय गावातच कार्यरत असावे

खाजगी जागेतील कामकाज थांबवावे

निधीचा योग्य वापर करून त्याची सखोल चौकशी करावी

आणि दोषींवर तात्काळ कारवाई करावी

 "कागज़ों में विकास है, असल में घपला,

पूछो मत हाल, बस फोटो पे है तमाशा!"

शासनाकडे कठोर कारवाईची मागणी

गावकऱ्यांनी शासनाकडे स्पष्ट इशारा दिला आहे की जर या प्रकाराची दखल घेऊन योग्य कारवाई झाली नाही, तर ग्रामपंचायतीप्रमाणेच लोकशाहीवरही प्रश्नचिन्ह निर्माण होई

 'ग्रामपंचायत' ही फक्त फोटोसाठी नको – ती कामासाठी हव!



Post a Comment

0 Comments