अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
परतूर तालुक्यातील सोलर प्लांटवर होत असलेल्या वारंवार चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत परतूर पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. केबल चोरी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करून तब्बल 1,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 27 ऑगस्ट रोजी पोलिस निरीक्षक सुदाम भागवत यांना खात्रीलायक माहिती मिळाली की मोजे खांडवी येथील सोलर प्लांटवरील केबल चोरी ही समीर काळे या आरोपीने आपल्या साथीदारांसह केली आहे. त्यानुसार पोलिसांनी समीर काळेला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदार सय्यद असेफ व शेख गौस यांच्यासह चोरी केल्याची कबुली दिली. पुढील चौकशीत या आरोपींनी मोजे मसला शिवारातील टाटा सोलारवरही तीन चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
पोलिसांनी तिन्ही आरोपींकडून चोरीस गेलेले तांब्याचे वायर जप्त केले असून त्याची किंमत 1.40 लाख रुपये इतकी आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी मोहिमेत परतूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक एस.बी. भागवत, पो.उ.नि. पल्लेवाड, अंमलदार अशोक गाढवे, गजानन राठोड, ज्ञानेश्वर वाघ, नरेंद्र चव्हाण, राम हाडे, विजय जाधव, गोविंद पवार, अच्युत चव्हाण व नितीन बोंडारे यांनी सहभाग घेतला.

Post a Comment
0 Comments