Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जालना शहरात पुन्हा बससेवा सुरू करण्याची मागणी

 



अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके 

अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतीने जिल्हा अध्यक्ष डॉ. रमेश तारगे यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका उप आयुक्त नंदा गायकवाड यांना शहरातून बस सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सन 2023 पूर्वी जालना शहरातील रेल्वे स्टेशन ते स्त्री रुग्णालय या मार्गावर बस सेवा सुरू होती. मात्र रस्त्यावरील अडचणींचे कारण देत ही सेवा बंद करण्यात आली. यामुळे अंबड ते मुख्य बसस्थानक प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाजगी वाहनधारकांकडून जादा भाडे मोजावे लागत असून सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक फटका बसत आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले.

तसेच, रेल्वे स्टेशन शेजारी असलेले एस.टी. बसस्थानक बंद असून तेथे अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे बससेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सुभाष चौक (बुद्धा बिल्डिंग) परिसरातील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी ना-फेरीवाला क्षेत्र घोषित करून पूर्वीप्रमाणे थांबे निर्माण करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

या प्रसंगी विधी सल्लागार अॅड. एम.जी. सोनुने, प्रांत सदस्य अॅड. डी.पी. पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments