श्री स्वामी समर्थाचे परमभक्त आणि सतत देवधर्माच्या सानिध्यात राहून समाजासाठी मार्गदर्शक ठरणारे ओमप्रकाश उत्तमराव देहडराय यांचा ५१ वा जन्मदिन गणपती बाप्पाच्या आगमनानंतर अतिशय उत्साह, भक्तिभाव आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
या वाढदिवसाचे वैशिष्ट्य असे की, त्यांच्या मातोश्री सौ. सुभद्राबाई देहडराय यांनी आपल्या लाडक्या सुपुत्राचे औक्षण करून मायलेकाच्या पवित्र नात्याचे दर्शन घडवले. मायलेका यांच्यातील अपार प्रेम, जिव्हाळा आणि आत्मीयतेची झलक या क्षणी सर्व उपस्थितांनी अनुभवली. जणू आईच्या आशिर्वादातून देवाचेच वरदहस्त त्यांच्या डोक्यावर लाभत असल्याचा भावनिक क्षण सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारा ठरला.
त्यानंतर ओमप्रकाश देहडराय यांनी आईचे चरणस्पर्श करून तिच्या आशिर्वादाची अनुभूती घेतली. मातोश्रींनी त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि अखंड यश लाभो, अशी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या क्षणी घराघरात ऐकू येणाऱ्या “आईच्या आशिर्वादाशिवाय यश मिळत नाही” या उक्तीचे प्रत्यक्ष दर्शन घडले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांसह देहडराय परिवारातील नातेवाईक, मित्रपरिवार व सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अंबड येथील बळीराम राऊत व संपूर्ण राऊत परिवाराने देखील आनंदमय शुभेच्छा देऊन कार्यक्रमाच्या सोहळ्यात आपले सहर्ष योगदान दिले.
वाढदिवसानिमित्त सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, समाजात नेहमीच आदर्शवत जीवन जगणारे आणि भक्ती व सेवेला सर्वोच्च मान देणारे ओमप्रकाश देहडराय हे व्यक्तिमत्व एक प्रेरणादायी ठरत असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.
भक्तिभाव, सामाजिक कार्य आणि मायलेकाच्या अटूट नात्याचा मिलाफ झालेल्या या वाढदिवस सोहळ्याने देहडराय परिवाराच्या आनंदात भर घातली.




Post a Comment
0 Comments