Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

जालना जिल्हा पोलीस दलामार्फत गणेशोत्सव-2025 साठी ऑनलाईन परवानगी अर्जाची सुविधा

 


सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन


अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके

जालना, प्रतिनिधी – जालना जिल्ह्यात 27 ऑगस्ट 2025 ते 06 सप्टेंबर 2025 या कालावधीत गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर उत्साहात साजरा होणार आहे. उत्सव काळात सार्वजनिक ठिकाणी गणेश मंडप उभारणे, मिरवणुका काढणे आणि ध्वनीवर्धक प्रणालीचा वापर यासाठी आवश्यक परवानग्या घेण्याची प्रक्रिया यंदा अधिक सुलभ करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक श्री. अजयकुमार बंसल आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळे, सामाजिक संस्था, नागरिक मंडळे आणि उत्सव संयोजकांसाठी ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरु करण्यात आली आहे. यामुळे अर्जदारांना प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात जाण्याची गरज न पडता घरी बसून परवानगी मिळवणे शक्य होणार आहे.

अर्ज करण्यासाठी मंडळांनी महाराष्ट्र पोलीस विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर – http://citizen.mahapolice.gov.in/Citizen/MH/Published FIRs.aspx – भेट देऊन अर्ज भरावा लागेल.

अर्ज सादर करताना आवश्यक माहिती:

मंडळाचे नाव, संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक

मंडप उभारण्याचे ठिकाण, तारीख व वेळ

मिरवणुकीचा मार्ग, वेळ व आयोजन तपशील

ध्वनीवर्धक प्रणाली वापरासंबंधी माहिती

उत्तरदायी व्यक्तीचे नाव, ओळखपत्र व संपर्क क्रमांक

कायद्याचे पालन करण्याचे घोषणापत्र

आपत्कालीन व्यवस्थापनाची आखणी

महत्त्वाच्या सुचना:

1. परवानगीशिवाय मंडप उभारणे, ध्वनीवर्धक वापरणे किंवा मिरवणूक काढणे कायद्याने निषिद्ध आहे.

2. अशा अनधिकृत कृती करणाऱ्या मंडळांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

3. सर्व मंडळांनी उत्सव शांततेत, शिस्तबद्ध पद्धतीने व कायद्याचे पालन करून साजरा करावा.

ऑनलाईन अर्ज सादर करताना तांत्रिक अडचण आल्यास संबंधित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जालना जि

ल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments