अंबड –
राजकारण बदलले, भूमिका बदलल्या... पण मैत्रीचं नातं मात्र अजूनही तसंच, जिव्हाळ्याचं! भाजपमध्ये अलीकडेच प्रवेश केलेले कैलास शेठ गोरंट्याल यांचा त्यांचे जुने मित्र, ज्येष्ठ पत्रकार व संपादक बळीराम राऊत यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, आणि या क्षणाने जुन्या आठवणींना चटका लावला नाही – तर नवसंजीवनी दिली!
सत्कार हे निमित्त ठरले... सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि पत्रकारितेच्या विषयांवर दिलखुलास चर्चा करण्यात आली. अनुभवाच्या देवाण-घेवाणीने संवाद रंगला, विचारांची देवाण-घेवाण झाली आणि खरं मैत्रीचं प्रतिबिंब या भेटीत उमटलं.
विशेष म्हणजे, भारतामध्ये जीएस कॉलेज, जालना येथे शिक्षण घेताना सुरू झालेली ही मैत्री – आज तब्बल ३३ वर्षांनंतरही तेवढ्याच जिव्हाळ्याने आणि आपुलकीने जपली जात असल्याचं दृश्य उपस्थितांना भावून गेलं.
“सत्ता, पक्ष, मतं... ही सगळी आज आहेत, उद्या नसतील; पण खरी मैत्री आयुष्यभर टिकते,” अशा अर्थपूर्ण शब्दांत बळीराम राऊत यांनी भावना व्यक्त केल्या.
या स्नेहभेटीत अंबड वार्ता कार्यालयाच्या नव्या जागेची माहिती देत गोरंट्याल यांना नव्या कार्यालयास भेट देण्याचे आमंत्रणही देण्यात आले.
राजकीय वर्तुळात ही भेट चर्चा आणि चर्चेचा विषय बनली असून, राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक खरी मैत्री कशी निखळ आणि टिकून राहते, याचं हे उदाहरण ठरलं आहे.

Post a Comment
0 Comments