अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
अंबड,दि.०१ ऑगस्ट : येथील कै. दत्ताजी भाले माध्यमिक विद्यालयात दिनांक १ ऑगस्ट २०२५ शुक्रवार रोजी लोकशाहीर तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच"अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सुधाकरजी घायतडक, प्रमुख उपस्थितीत विद्यालयातील सहशिक्षक श्री. लक्ष्मीकांत सामग व श्री. गजानन उबाळे हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्री. लक्ष्मीकांत सामग यांनी लोकमान्य टिळकांनी केलेल्या कार्याची माहिती सांगून त्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी. तसेच स्वभाषा, स्वदेशी व त्यांच्या विचारांचे आपल्या जीवनात आचरण करावे.अंगी धाडस बाळगणे महत्त्वाचे आहे, धाडसामुळेच लोकमान्य टिळकांनी "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" हा मंत्र देशाला दिला.
तसेच कार्यक्रमासाठी दुसरे प्रमुख उपस्थित श्री गजानन उबाळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की, लहानपणापासून ज्यांच्या रक्तामध्ये देशप्रेम भरले होते असे देशभक्त लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे होते .लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी दीड दिवसाची शाळा करून सुद्धा साहित्यरत्न ही पदवी मिळाली होती. अण्णाभाऊंचे साहित्य रशिया देशापर्यंत गेलं व तिथे त्यांचा सत्कार करण्यात आला. भारतीय परंपरेची जपणूक केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक,परिचय,सूत्रसंचालन व आभार श्रीमती निशा जोशी- अभ्यासपूरक मंडळ प्रमुख यांनी केले. विद्यार्थ्याच्या कल्याणमंत्राने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी शिक्षण विवेक मासिकाच्या जुलै अंकाचे विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमाला शिक्षिका रेखा देशमुख, शाम सावंत यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments