अंबड वार्ता प्रतिनिधी आकाश जळके
परतुर शहर व जिल्ह्यात मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला परतुर पोलिसांनी गजाआड केले असून, त्याच्याकडून तब्बल ₹7,70,000 किंमतीच्या 11 महागड्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
मा. पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली परतुर पोलीस निरीक्षक एस.बी. भागवत यांनी विशेष तपास पथक नेमून कारवाई केली. तपासादरम्यान सुरेश भगवान आवुज (वय 21, रा. आवुजवाडी, ता. माजलगाव, जि. बीड) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने परतुरसह जालना, बीड, आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली.
जप्त मोटारसायकली:Honda Shine – 04Honda Unicorn – 02Hero Passion Pro – 01Hero Splendor+ – 02Hero HF Deluxe – 01Yamaha XZ – 01
या कारवाईत पोउपनि अमोल रावते, अंमलदार धर्मा शिंदे, अशोक गाढवे, किरण मोरे, गजानन राठोड, विजय जाधव, भागवत खाडे, अमोल गायकवाड, राम हाडे, नरेंद्र चव्हाण, दशरथ गोपनवाड, सॅम्युअल गायकवाड, पवनकुमार धापसे यांनी सहभाग नोंदवला.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी देखील मार्गदर्शन केले. पुढील तपास सुरु आहे व अजून अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Post a Comment
0 Comments